Advertisement

कोस्टल रोडवर पहिला अपघात, व्हिडिओ व्हायरल

या मार्गावर काही वेळासाठी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

कोस्टल रोडवर पहिला अपघात, व्हिडिओ व्हायरल
SHARES

कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्गावर पहिल्या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास कोस्टल रोडवर हा अपघात झाला. ज्यानंतर या मार्गावर काही वेळासाठी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

अपघातनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमुळं घटनास्थळाची दृश्य सर्वांसमोर आली. कोस्टल रोडच्या लोकार्पणानंतर हा पहिलाच अपघात आहे. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती देण्यात येत आहे. 

प्राथमिक माहितीनुसार अपघातानंतर इमर्जन्सी कॉल बॉक्स (ECB)मधून एका व्यक्तीनं संपर्क साधत  CP-5 पाशी असणाऱ्या बोगद्यामध्ये दुर्घटना झाल्याची माहिती दिली. ज्यानंतर तातडीनं सीसीटीव्हीच्या माध्यमातून या घटनेची पडताशळणी करण्यात आली. जिथं काळ्या रंगाच्या टोयोटा कारला अपघात झाल्याची बाब समोर आली. 

कारचं स्टेअरिंग सैल झाल्यामुळं अपघात घडल्याची माहिती कारचालकाकडून मिळाली असून, या कारमधून प्रवास करणारे दोनजण सुरक्षित असल्याचं वृत्त मिळत आहे. या अपघातात कारला मोठं नुकसान झालं असून, या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली. ट्राफिक नियंत्रणात आणण्याचं काम हाती घेतलं आणि तेथील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याच्या अनुषंगानं पावलं उचलली.

याशिवाय अपघातानंतर कारचं ऑईल बोगद्यामध्ये पसरल्यामुळं कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी हे ऑईलही स्वच्छ करण्याचं काम करण्यात आलं. 



हेही वाचा

ठाणे-दिवा आणि GTB-चुनाभट्टी स्थानकांवर दोन नवीन फूट ओव्हर ब्रिज सुरू

महाराष्ट्रात 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा