Advertisement

जेईई-मेन आणि बोर्डाच्या परीक्षा क्लॅश; तारखा पुढे ढकलण्याची मागणी


जेईई-मेन आणि बोर्डाच्या परीक्षा क्लॅश; तारखा पुढे ढकलण्याची मागणी
SHARES

जेईई-मेन आणि बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा क्लॅश होत असल्याने त्यात बदल करण्यात यावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जेईई मेन परीक्षा पहिला टप्पा 16 ते 21 एप्रिल दरम्यान होणार असून दुसरा टप्पा 24 ते 29 मे दरम्यान होणार आहे. त्याच कालावधीत अनेक राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षाही होतात.

विद्यार्थ्यांना एकाचवेळी या दोन्ही परीक्षांचा अभ्यास करण्यास वेळ मिळणार नाही. त्यामुळे परीक्षांच्या तारखा बदलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जेईई मेन्स परीक्षेसाठी 1 मार्चपासून नोंदणी सुरू झाली असून ती 31 मार्चपर्यंत चालू राहणार आहे.

जेईई मेन्स परीक्षेच्या तारखा बोर्डाच्या परीक्षांच्या काळात येणार नाही याची काळजी घेऊन त्याप्रमाणे वेळापत्रकात बदल केला जावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.

सीबीएसई बोर्डाची टर्म-2 ची परीक्षाही एप्रिलमध्येच होणार आहे. पालकांनी राष्ट्रीय चाचणी संस्था आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा