Advertisement

'सवाई'त सामान्य प्रेक्षकांना अधिक आसनं हवीत


'सवाई'त सामान्य प्रेक्षकांना अधिक आसनं हवीत
SHARES

प्रभादेवी - 'सवाई' या नामांकित स्पर्धेत अासनांच्या आरक्षणामुळे दरवर्षी सामान्य प्रेक्षकांमध्ये नाराजी असते. यामध्ये 100 टक्क्यांपैकी 64 टक्के आसने दरवर्षी आरक्षित केली जातात. रवींद्र नाट्यगृहाची मर्यादा 911 आसनांची असूनही 600 आसनांचीच विक्री केली जाते. तर 300 आसने आरक्षित असतात. त्यामुळे आयोजकांनी सामान्य प्रेक्षकांसाठी आसनांची मर्यादा वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यंदा यावर तोडगा म्हणून एका व्यक्तीस चारच्या ऐवजी तीन पास वितरीत केले गेले. तरीही जास्तीत जास्त 600 आसनांचीच विक्री झाली. पण प्रेक्षकांचा ओघ पाहता सदर संख्या पुरेशी नसल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे निदान आरक्षित कोटा कमी करावा जेणेकरून जास्तीत जास्त प्रेक्षकांना याचा फायदा होईल अशी मागणी प्रेक्षक दर्शन इंगळे यांनी सांगितलं. शिवाय या कोटा पद्धतीमुळे ज्यांना सवाई पहायची इच्छा असते त्यांना ती पाहता येत नाही. त्यामुळे या कोट्यात प्रेक्षकांना वाव द्यावा अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा