Advertisement

'देवा'समोर थिएटरचं विघ्नं!

सलमान खानचा 'टायगर जिंदा है' आणि अंकुश चौधरीचा 'देवा' हे दोन चित्रपट एकाच दिवशी म्हणजे २२ डिसेंबरला सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहेत. मात्र 'देवा'ला थिएटरमध्ये जास्त शो मिळू न शकल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना खरमरीत पत्र लिहून मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा दिला अाहे.

'देवा'समोर थिएटरचं विघ्नं!
SHARES

सलमान खानचा 'टायगर जिंदा है' आणि अंकुश चौधरीचा 'देवा' हे दोन चित्रपट एकाच दिवशी म्हणजे २२ डिसेंबरला सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहेत. 'टायगर जिंदा है' चित्रपटाला ९५ टक्के शो मिळाले असून 'देवा' चित्रपटासमोर अाता थिएटरचं विघ्नं अालं अाहे. मराठी चित्रपटाला थिएटरमध्ये जास्त शो मिळू न शकल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना खरमरीत पत्र लिहून मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा दिला अाहे.




अमेय खोपकर यांनी चित्रपट मालक अाणि व्यवस्थापकांना चांगलंच सुनावलं असून देवा या चित्रपटाला थिएटर मिळालं नाही तर मनसे स्टाईलने ते मिळवू, असा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्राची अस्मिता जपणं आणि मराठी चित्रपटांना त्यांचे हक्क मिळवून देणं, हा आमचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी अाम्ही सक्षम अाहोत. अाम्ही समंजस आहोत, सहनशील आहोत म्हणजे दुर्बल आहोत, असा गैरसमज तुम्ही करून घेतला असेल तर तो दुर्दैवी आहे, अशा शब्दांत खोपकर यांनी व्यवस्थापकांची कानउघडणी केली आहे.


">


'टायगर जिंदा है' अाणि 'देवा'  हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत अाहेत. पण यशराज बॅनरखाली प्रदर्शित होणाऱ्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाकडून थिएटर मालकांना सज्जड दम देऊन सर्व चित्रपटगृहांवर कब्जा केला अाहे. बाकी निर्मात्यांनी काय करायचे? कुठे जायचे? हिंदी निर्माते जर अशी मोनोपॉली करणार असतील तर मराठी निर्मात्यांनी काय करायचे? आम्ही आता फक्त पत्र देऊन व्यवस्थापकांची कानउघडणी केली आहे. 'देवा'ला प्राइम-टाइम द्यावा, अशी विनंती केली आहे. तरीही हा प्रश्न सुटला नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ. 

- अमेय खोपकर, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा