Advertisement

रेल्वे प्रवासी सुरक्षा सप्ताहाचं आयोजन


SHARES

मुंबई - रेल्वे... मुंबईची लाइफ लाइन. प्रवाशांच्या हलगर्जीमुळे ठरतेय डेथलाइन. वर्षागणिक हजारो प्रवासी पडतात मृत्यूमुखी. रेल्वेकडून करण्यात येणाऱ्या सुचनांकडे नेहमीच प्रवासी कानाडोळा करतात आणि आपला जीव गमावतात. पण रेल्वे प्रवासी सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं जीआरपी पोलिसांनी पुढाकार घेतलाय. नागरिकांना सतर्क करण्यासाठी काही व्हिडिओ जीआरपीनं प्रदर्शित केलेत.
लोकलच्या छतावर, दरवाज्यात स्टंटबाजी करणारे, घाई गडबडीत लोकल पकडणारे प्रवासी आणि रेल्वे रूळ क्रॉस करणारे अतिहुश्शार... पण आयुष्य म्हणजे खेळ नाही, हे या व्हिडिओद्वारे सांगण्यात आलंय. रेल्वेत घडणारे गुन्हे, त्याचा कशाप्रकारे सामना कराल, अशी जनजागृतीही व्हिडिओच्या माध्यमातून केलीय.
प्रवाशांचे डोळे उघडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर मानवी साखळी तसंच पथनाट्याचंही आयोजन केलंय. तसंच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष भरारी पथकं स्थापन केलीयेत. प्रवाशांसाठी रेल्वे एवढं करतेय मग आता जबाबदारी आपली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा