नीट परीक्षेसाठी बुरख्याला परवानगी

  • Mumbai Live Team
  • Education

देशभरात होणाऱ्या नीट परीक्षेच्या नियमावलीत बुरख्याबाबत कोणतीच सूचना अद्याप आलेली नाही. गेल्यावर्षी सीबीएसई मंडळाने बुरख्याला परवानगी नाकरल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे यावर्षी ड्रेस कोडमध्ये बुरख्याला परवानगी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

यावर्षी नीटची परीक्षा 7 मे रोजी होणार आहे. यासाठी सीबीएसई बोर्डाने परीक्षेसाठी ड्रेसकोड जाहीर केला आहे. परीक्षेच्या दिवशी फिकट रंगाचे कपडे वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी हाफ स्लीव्हज घालणे बंधनकारक आहे. परीक्षेला येताना बुटांऐवजी स्लीपर घालावी, असंही या सूचनेत म्हटलं आहे. परीक्षा सकाळी 9.30 वाजता सुरू होत असली तरी, तपासणीसाठी विद्यार्थ्यांना तब्बल 2 तास आधी परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. गेल्यावर्षी तपासणी दरम्यान अनेक मुलांच्या शर्टाच्या बाह्य फाडाव्या लागल्यामुळे यावर्षी सीबीएसई बोर्डाने अगोदरच ड्रेसकोडसंबंधी सूचना जाहीर केल्या आहेत.

तसेच मुलींच्या कानातील बाळ्या, दुपट्टे, हेअर पीन, बांगड्या काढायला लावल्या होत्या. मुलांचे फुल शर्ट हाफ करण्यात आले होते. जोडे चपला, मोजे, गळ्यातील चेन, घड्याळ काढल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला होता. यामुळे नीटच्या नियोजन पद्धतीवर आक्षेप घेण्यात आल्याने मंडळाने अगोदरच ड्रेसकोड जाहीर केला आहे.

Next Story
More News