या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत का?

दिवसेंदिवस जाहिरातींची क्रेझ वाढतच चालली आहे. आजच्या काळात जाहिरातींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या जाहिरातीही प्रेक्षकांच्या मनावर चांगल्या प्रकारे छाप पाडतात. काही वेळा तर प्रेक्षक जाहिरातींच्या इतक्या प्रेमात पडतात की, त्या जाहिरातींच्या टॅग लाई्न्स ते रोजच्या बोलण्यात सहज वापरतात.काही जाहिरातींची पंच लाईन आपल्याला अगदी तोंडपाठ होते. प्रेक्षक या जाहिरातींच्या इतक्या प्रेमात पडतात की, या जाहरातींचे व्हिडिओ प्रेक्षक आवडीनं यु-ट्युबवरही पाहतात. चला तर मग अशाच काही जाहिरातींवर टाकूया एक नजर.



1) क्या आपके टुथपेस्ट में नमक है?

कोलगेटच्या टुथपेस्टची ही टॅगलाईन प्रेक्षकांना चांगलीच लक्षात असेल. अगदी मजा मस्तीमध्ये युवावर्गाचे प्रतिनिधी एकमेकांना हा डायलॉग ऐकवताना तुम्ही पाहिलं असतील. तरूणच काय अगदी तुम्ही सुद्धा थट्टा-मस्करीत हा डायलॉग कुणाला तरी ऐकवला असेल

2) हम क्लोरमिंट क्यों खाते है?

क्लोरमिंटची जाहिरात तर खूपच प्रसिद्ध झाली होतीहम क्लोरमिंट क्यो खाते है? हा प्रश्न आजही अनेकांना सतावतोमित्रांमध्ये तर ही टॅगलाईट खूपच हिट ठरली आहेमस्करी म्हणून अनेकदा आपण आपल्या मित्राला या टॅगलाईनमुळे चिडवतोही.  

3) मेलडी इतनी चॉकलेटी क्यों है?

मेलडी इतनी चॉकलेटी क्यो हैया प्रश्नाचं उत्तर तर स्वत:कंपनीला देखील माहिती नसेलपण जाहिरातीत वापरलेली पंच लाईन प्रचंड चाललीबच्चेकंपनीपासून ते साठी ओलांडलेल्या बृद्धांपर्यंत फक्त एकच प्रश्न सतावत असेल आणि तो म्हणजे मेलडी इतनी चॉकलेटी क्यों है?

4) आप क्लोजअप क्यो नहीं करते है?

कोलगेटच्या टुथपेस्ट में नमक... वाल्या जाहिरातीच्यादरम्यानच क्लोजअपची जाहिरात आली होती. दोन्ही जाहिराती एकाच वेळी प्रदर्शित झाल्या होत्या. पण तरीही दोन्ही जाहिरातींची लोकांमध्ये चांगलीच क्रेझ होती

5) थंडा मतलब?
थंडा मतलब....? या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरजच नाही. कारण याचं उत्तर तर प्रत्येकाला नक्कीच माहिती असेल. कोकाकोलाच्या या जाहिरातीत आमिर खाननं विचारलेला प्रश्न अनेकांना कायमचाच लक्षात राहिला. या जाहिरातीमुळे कोका कोलाच्या विक्रीत चांगलीच भर पडली होती. बच्चे कंपनीच्या तर अगदी तोंडपाठ झाला होता हा डायलॉग

Next Story
More News