50 वर्षांचा महागणपती

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

दादरच्या महागणपतीला यंदा 50 वर्षे पूर्ण झालेत. या गणपतीच्या दर्शनासाठी अनेक कलाकार येतात. तर मराठी कलाकार उमेश कामत दरवर्षी बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थिती लावतो. या ठिकाणी स्थापन करण्यात येणारी साडेपाच फुटांची भव्य गणेशाची मूर्ती गेल्या 25 वर्षांपासून मूर्तीकार राजन खातू साकारत आहेत. मंडळातील सदस्यांकडून जमा करण्यात आलेल्या वर्गणीतून उत्सवाचा खर्च काढला जातो. यंदा डेकोरेशनमध्ये साधा महाल साकारण्यात आला आहे.  स्थापनेला 50वे वर्ष  असल्यामुळे मंडळातील सदस्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे. त्यानिमित्ताने चित्रकला स्पर्धा, आरोग्याच्या दृष्टिने शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या