मनसेकडून कृत्रिम तलावाची सोय

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

घाटकोपर - घाटकोपरच्या ११९ वॉर्ड मनसेचे नगसेवक संजय भालेराव आणि पालिकेच्या वतीने कृत्रिम तलावाची निर्मीती करण्यात आली. घाटकोपर पश्चिम येथील बाबु गेणू मैदानात चार फुटाचे कृत्रिम तलाव बांधण्यात आले. या तलावात साडे तीन फुटापर्यंतच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. कृत्रिम तलाव उभारण्याचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. यावेळी पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी कृत्रिम तलावामध्ये बाप्पाला विसर्जन करणा-यांना तुळशीचे रोपटे आणि मराठमोळा फेटा बांधून अभिनंदन करण्यात आले. त्यातून ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गणेश विसर्जनांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, म्हणून पोलिसांच्या मदतीसाठी राम निरंजन झुनझुनवाला कॉलेजचे विद्यार्थींनी देखील सहभागी झाले होते. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या