रायपाडाचा 'दिल'से देखावा

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

झपाटयानं बदलत असलेली लाईफस्टाईल, कामाचा ताण यामुळे माणसाच्या हृदयावर परिणाम होत आहे. कमी वयात अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू ओढावत आहे. त्यामुळे हृदयाची काळजी घ्या, असा संदेश मालाड रायपाडा गणेशोत्सव मित्र मंडळाच्या देखाव्यातून देण्यात आला आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करत असताना वडीलांना हृदयाचा झटका येतो, असं देखाव्यात मांडण्यात आलंय. 5 हजार पेपर कप वापरून गणेशाच्या मूर्तीची सजावट करण्यात आलीय. सिध्दांत नाईक या आर्टिस्टनं 15 दिवसांत ही मूर्ती साकारली आहे. विसर्जनावेळी अवघ्या 10 ते 15 मिनिटांत मूर्ती पाण्यात विरघळू शकते, अशी माहिती मंडऴाचे अध्यक्ष संजय तुळसणकर यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या