लवंग, दालचिनीपासून साकारला बाप्पा

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मालाड पश्चिमेकडील श्री साईनाथ मित्र मंडळानं इको फ्रेंडली गणपत्ती बाप्पा साकारला आहे. जुन्या वर्तमानपत्रांचा लगदा आणि तांदळाचे पाणी मिश्रीत करून इको फ्रेंडली गणेशमूर्ती साकारली आहे. तब्बल साडे नऊ किलो वजनाची ही मूर्ती आहे. या मुर्तीच्या सजावटीसाठी 9 किलो लवंग, 20 किलो दालचिनी, 2 किलो लाल मिरची, 6 किलो वेलची, 1 किलो मोहरीचा वापर करण्यात आला आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना 36 दिवसांचा कालावधी लागला. 

पुढील बातमी
इतर बातम्या