बाप्पांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

एकीकडे बाप्पाच्या आगमनाच्या तयारीचा उत्साह आहे. तर दुसरीकडे अनेक भक्तमंडळी विसर्जनादरम्यान कुठल्याही प्रकारची हानी किंवा प्रदूषण टाळण्यासाठी सज्ज झाले आहेत. याचेच एक उदाहरण समोर आले आहे. गणपती विसर्जनासाठी प्रतीक्षानगर येथील स्वामीसमर्थ इमारतींसमोरील खेळाच्या मैदानात एका कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या ५ वर्षांपासून ही योजना राबवली जाते. ही सोय फक्त येथील रहिवाशांसाठी मर्यादित नसून अनेक घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन येथे केले जाते.

पुढील बातमी
इतर बातम्या