यांचा आदर्श घ्या !

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

कायदा हा सर्वांसाठी समान असतो. कायद्यापुढे कुणी मोठं नाही किंवा छोटं नाही. आणि याचचं उदाहरण दिलं साकिनाका पोलीस स्टेशनचे डिसीपी विनायक देशमुख यांनी. ट्राफिक नियम तोडल्यानं डिसीपी विनायक देशमुख यांनी स्वत:च्या कार्यालयातल्या दोघा पोलीस हवालदारांचं चालन कापलं. शब्बीर पटेल आणि धम्मपाल सरपाते यांच्यावर डिसीपीनं हेल्मेट न घातल्यानं कारवाई केली. तसंच कार्यालयातल्या सर्व पोलिसांना ट्राफिक नियम पाळण्याची ताकिद दिली. त्यामुळे सर्वांनी डिसीपी विनायक देशमुख यांचा आदर्श घ्यावा.    

 

पुढील बातमी
इतर बातम्या