'दादरचा राजा'चरणी सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

दादरचा राजा म्हणजे दादर विभागातील प्रसिद्ध गणपतींपैकी एक. यावर्षी या गणपतीच्या चरणी विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेय. 

यावर्षी मंडळानं मयूर पॅलेस साकारला आहे. येथील गणेशमूर्ती चिंचपोकळीचे मूर्तीकार बंटी पोळेकर यांनी घडवलेली आहे. तर सजावट रितेश जाधव यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे. 1939 साली स्थापन करण्यात आलेल्या या मंडळाचं हे 78 वं वर्ष आहे. त्यानिमित्तानं मंडळाच्यावतीनं आरोग्य शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर ठेवण्यात आलं आहे. तसंच शालेय मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजनही होणार आहे.  

पुढील बातमी
इतर बातम्या