दहिसरमधील भाजी मार्केट पुन्हा बंद

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

दहिसर - लाखो रुपये खर्च करून अशोक वन येथे बनवण्यात आलेले भाजी मार्केट पुन्हा एकदा बंद पडले आहे. 30 डिसेंबर 2016 मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर हे भाजी मार्केट सुरू केले होते. याचे उद्घाटनही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले होते. पण हे भाजी मार्केट पुन्हा बंद झाले आहे. 

या परिसरातल्या रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या भाजी मार्केटमधल्या भाज्यांचे दर अधिक होते. त्या तुलनेत रस्त्यावर स्वस्त भाजी मिळते. त्यामुळे या मार्केटमधून भाजी घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. याच कारणास्तव भाजी मार्केट बंद झाले, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. पण या भागातील शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक संजय घाडी यांनी हे भाजी मार्केट पुन्हा सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. फक्त भाजी मार्केटच नाही तर फिश मार्केटही सुरू करण्याचा घाडी यांचा प्रयत्न आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या