हा नाला की कचरापेटी?

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

मालवणी - येथील नाल्यात मोठया प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. मालवणीतील नाल्यात वर्षाचे बाराही महिने कचऱ्याचा ढीग साचलेला असतो. पालिका विभागाकडून पावसापूर्वी एकदा नाला साफ केला जातो. नाला उघड्या स्थितीत असल्यामुळे परिसरातील नागरिक घरातील कचरा कचरा पेटीत न टाकता थेट नाल्यात टाकतात. त्यामुळे, नाल्यात नेहमीच कचरा साचत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

याबाबत पी उत्तर पालिका विभागाकडे विचारणा केली असता, येत्या महिन्याभरात नाले सफाईच्या निविदा निघतील आणि त्यानंतर नालेसफाई सुरू केली जाईल, असं पी उत्तर पालिका विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या