इको फ्रेंडली गणपतीचा यशस्वी प्रयोग

इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करण्यासाठी  उत्सवी या संस्थेने यंदा नवीन प्रयोग केला आहे. या संस्थेने कागदाच्या लगद्यापासून गणेशाची मूर्ती तयार केली आहे. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार यंदा 100 मूर्ती प्रदर्शनासाठी ठेवल्या असून यांची उंची 8 इंच ते 24 इंचापर्यंत आहेत. त्यांच्या किमती 3 हजार 900 पासून ते  6 हजार 600 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 80 टक्के मूर्ती गणेश भक्तांनी बुकिंग देखील केल्या आहेत. यावर्षीचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षी जास्त प्रमाणात मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या जाणार असल्याचे उत्सवी संस्थेचे संस्थापक नाना शेंडकर यांनी सांगितले. पर्यावरण पूरक या गणेश मूर्ती आणि मखरांचा उपयोग सर्वांना व्हावा या संकल्पनेतून अनेक महिला बचत गटांनादेखील वाजवी दरात मखरे विक्रीसाठी देण्यात आली आहेत. असेही ते म्हणाले.

पुढील बातमी
इतर बातम्या