60 वर्षांपासून इकोफ्रेडली गणेशोत्सव

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

पर्यावरण हेच जीवन असून पर्यावरणाला जगवणे आज खऱ्या अर्थाने महत्वाचे झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेल्या शिवडी शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली 60 वर्ष पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने शाडू मातीची बाप्पांची मूर्ती बसवून इकोफ्रेडली गणेशोत्सव साजरा करत आहे. त्याचबरोबर मंडळाने गणेशोत्सवादरम्यान अनेक समाजप्रबोधनात्मक देखावे सादर करून भक्तांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य केले जाते. यंदा मंडळाने पुरातन मंदिरचा देखावा साकारला आहे. तसेच मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येत असतात असे मंडळाचे अध्यक्ष राहुल कोरडे यांनी सांगितले.  

पुढील बातमी
इतर बातम्या