मोनोच्या स्थानकाला प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर नाव देण्याची मागणी

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वडाळा - वडाळ्यात बांधण्यात आलेल्या मोनो रेलच्या स्थानकाला दादर पूर्व हे नाव नं देता 'प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर’ असं नाव देण्यात यावं, या मागणीसाठी बुधवारी उपोषण करण्यात आलं. वडाळा नागरिक दक्षता समितीकडून हे आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून वडाळा नागरिक दक्षता समिती पाठपुरावा करत आहे. पण, अजूनही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे समितीने आंदोलनाचं हत्यार उपसलं. तर, जोपर्यंत या प्रकरणाची सरकार दखल घेत नाही तो पर्यंत हे उपोषण असंच सुरू राहणार असल्याचं ही या वेळी स्पष्ट झालंय.

पुढील बातमी
इतर बातम्या