बुडणाऱ्याला दिले जीवनदान

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

कुलाबा - रेडिओ क्लब समोरील समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवण्यात एका तरुणाला यश आलंय. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पीर मोहम्मद या तरुणाने समुद्रात उडी मारली जीवदान दिले. गुरुवारी रात्री 11.20 च्या सुमारास मुंबईला मध्यप्रदेश येथून फिरायला आलेला 26 वर्षीय तरुण देविश कनसिथीया हा रेडिओ क्लबसमोरील समुद्राच्या कडेवर बसला होता. अचानक देविशचा तोल मागे गेला आणि तो समुद्रात पडला. त्यावेळी तेथे असलेले प्राणीमित्र राजेशभाई यांनी त्याची माहिती बीट मार्शल दिपक येथी आणि भालेराव यांना दिली. त्या ठिकाणी बीट मार्शल गेले असता कुलाबा येथे वास्तव्यास असलेल्या पीर मोहम्मद याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या तरुणाला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली. त्यावेळी तेथे तैनात असलेले कुलाबा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राऊत आणि पोलीस निरीक्षक भोई यांनी एक दोर आणून अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी पीर मोहम्मदला मदत केली. यानंतर कुलाब्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धोपावकर यांनी पीर मोहम्मदला पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा सत्कार केला. तसेच चांगली कामगिरी केल्याबद्दल अहवाल सादर करुन परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त यांच्याकडून प्रशिस्त प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अहवाल सादर केला.

पुढील बातमी
इतर बातम्या