गणेशोत्सवासाठी सजल्या बाजारपेठा

सोमवारपासून संपुर्ण राज्यभरात गणरायाचे आगमन होणार आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. घाटकोपर परिसरातील सर्वच बाजारपेठा विविध सजावटीच्या वस्तूंनी सजल्या आहेत. गणरायासाठी रुद्राक्षाचे, सोनेरी मण्याचे हार, लाल-पिवळ्या गोंड्याचे हार, मोत्यांचे हार आणि जरिवाला हार गणेश भक्तांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. सजावटीसाठी कमळाची लहान-मोठी आकर्षक अशी फुलेसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. धूप, कापूर, गुलाब-गंगा जल, सुगंधी अत्तर, गणपतीच्या पुजेसाठी लागणाऱ्या विविध साहित्य बाजारात उपलब्ध आहेत. मोत्यांपासून बनवलेले फेटे सुद्धा दिसून येतात. तसेच गणरायासाठी कमरपट्टा, मुकुट दागिन्यांचा देखील समावेश होतो.

पुढील बातमी
इतर बातम्या