150 जणांना ठगणारा 420

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

मंत्रालयात नोकरीच आमिष दाखवून 150 तरूणांना लाखोंचा गंडा घालणा-या 420 ला भायखळा पोलिसांनी जेरबंद केलंय. किरदा मानगूटे असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी मानगूटेकडून आठ बँकांची पासबुक्स, एटीएम कार्ड तसंच कित्येक सिम कार्ड जप्त केली आहेत.किरदानं तब्बल १५० लोकांना फसवून त्यांच्याकडून २६ लाख  उकळले.

 या मानगुटेची मोडस ऑपरेंडी ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. वर्तमान्पपात्रं तसंच जस्ट डायलसारख्या ठिकाणावरून मोठमोठया लोकांचे नंबर घ्यायचा. त्यांना आपण मोठा अधिकारी असल्याचं भासवून त्यांच्याकडून गरजू तरुणांचे नंबर तसंच माहिती घ्यायचा. त्यानंतर गरजू तरूणांना गंडा घालायचा. 

पुढील बातमी
इतर बातम्या