मोतीबाग मंडळाचा समाजप्रबोधनावरील चलचित्र देखावा

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

समाज प्रबोधनाच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या मोतीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 35 व्या वर्षात पदार्पण केले आहे. समाजप्रबोधनावर आधारित साजरे केले जाणारे चलचित्र देखावे हे या मंडळाचं वैशिष्ट्य. यावेऴच्या देखाव्यातून मंडळानं महिला सबलीकरणाचा विषय हाताळला आहे. स्त्री-पुरुष समानता असावी, स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळावा, असा देखावा साकारण्यात आला आहे. या मंडळाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे मंडळाची गणेशमूर्ती. येथील गणेश मूर्ती 21 मुखी असून ती फायबरचा उपयोग करून साकरण्यात आली आहे. तसंच या मूर्तीचं विसर्जन करण्यात येत नाही. 

 

 

पुढील बातमी
इतर बातम्या