मोटरमनच्या प्रसंगावधानानं महिलेचा जीव वाचला

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

चर्नीरोड - रेल्वे रूळ ओलांडू नका हे वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र प्रवासी या सूचनेकडे नेहमीच कानाडोळा करतात. चर्नीरोड स्टेशनवर घडलेली घटना याचेच एक उदाहरण. 6 डिसेंबरची ही घटना आहे. 11 वाजून 36 मिनिटांनी चर्चगेटला जाणारी लोकल चर्नीरोड स्टेशनवर येत होती. एक महिला ट्रॅकमधून चालत असतानाच ट्रेन समोर येते. महिला घाबरते, गोंधळते. काय करावे हे तिला सुचत नाही. पण लोकलचे मोटरमन संतोष कुमार गौतम यांनी प्रसंगावधानता दाखवली. रेल्वे स्टेशनवरील प्रवासी आरडाओरडा करतात. महिलेला बाजूला होण्यासाठी आवाज देतात. गोंधळलेल्या महिलेला बाहेर पडण्याचा रस्ताच सापडत नाही. ती तशीच रेल्वेच्या दिशेने चालत येत असते. आता महिला वाचणार नाही असे तिथल्या प्रवाशांना वाटते . पण अगदी अर्धा फुटावर येऊन लोकल थांबते. मोटरमननं प्रसंगावधान दाखवत लोकल वेळीच थांबवल्यानं महिलेचा जीव वाचला. ट्रेन थांबल्यावर फलाटावर चढायलाही महिलेला जमत नसते. तेवढ्यात दोन तरूण येतात आणि महिलेला वर खेचतात आणि महिलेचा जीव थोडक्यात वाचतो.

पुढील बातमी
इतर बातम्या