खड्डे भरण्याची बोंब, नागरिकांची बोंबाबोंब !

  • पूजा भोवड & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वांद्रे पूर्व - मुंबईत फक्त 39 खड्डे असल्याचा अहवाल पालिकेत सादर झालाय. पण वांद्रे पूर्व भागात आलं तर पालिकेच हा दावा किती खोटा आहे याची सहज खात्री पटते. वांद्रे पूर्व भागातून स्टेशनकडे जाणा-या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झालीये. शिवाय या भागातून स्टेशनकडे जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या गाड्या पार्क केल्या जातात. रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचरापेटीत कचरा कमी आणि रस्त्यावरच जास्त असतो. पण या सर्व गोष्टींकडे पालिका आणि स्थानिक नगरसेवकांचं दुर्लक्षच झाल्याचं पहायला मिळतंय. स्थानिकांच्या तक्रारींना तात्पुरत्या दिलाशाशिवाय काहीही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे परस्पर 39 खड्ड्यांचा अहवाल देणा-या पालिका अधिका-यांनी रस्त्यावर उतरून खड्ड्यांची मोजणी केली तरच काहीतरी फरक पडेल अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या