सामाजिक भान जपणारा 'परळचा राजा'

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

परळ - 'परळचा राजा' नरेपार्कच्या गणपती मंडळाचं 71 वे वर्ष असून 28 फुटांची मनमोहक बाप्पाची मूर्ती साकारण्यात आलीय. हा बाप्पा गिरणीकामगारांच्या परिसरातील या परळच्या राजाची भव्य मूर्ती आणि सामाजिक जाणिवेवर आधारित चलचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवातुन जनजागृती करण्याबरोबरच मंडळातर्फे अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. प्रबोधनकार देखाव्यातून व्यसनाधीनता, दुष्काळग्रस्थांच्या व्यथा, पर्यावरण, स्त्रीभूणहत्या, बेटीबचाव-बेटी पढाव असे अनेक सामाजिक उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात येतात. तसंच मंडळाच्या वतीने अलिबागमध्ये रोपे लावण्यात आली आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी मंडळाने घेतलीय. उत्सवासाठी येणाऱ्या पाहुण्यांना तुळशीची रोपे भेट देऊन पर्यावरणाचा संदेश देण्यात येतो. मंडळाने वाड्यातील कुरुळ गाव दत्तक घेतले असून तेथेही मोठ्या प्रमाणात रोपे लावण्यात आली आहेत, असे मंडळाचे विश्वस्त निलेश डांगवे यांनी सांगितले. 

पुढील बातमी
इतर बातम्या