बस स्टॉप झाले खड्डेमय

कुर्ला पूर्वेकडील बस डेपो खड्डेमय झालंय..गेल्या अनेक वर्षांपासून या बस डेपोची ही अवस्था आहे.मोठ्या प्रमाणात या बस स्टॉपवर खड्डे पडल्याने बेस्टचालकांसह प्रवाशांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय..दरवर्षी पालिका इथल्या रस्त्यांची डागडुजी करते. मात्र डागडुजीनंतर महिनाभरातच पुन्हा या डपोमध्ये मोठ-मोठे खड्डे पहायला मिळत आहेत. एकीकडे बेस्ट सध्या तोट्यात आहे. त्यातच या खड्यांमुळे बसच्या दुरुस्ती खर्चात अधिकच भर पडत आहे. बेस्ट डेपोच्या प्रवेशदराजवळ सात ते आठ फुट लांबी आणि रुंदी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे जास्त पाऊस पडल्यास हे खड्डे पूर्णपणे पाण्याने भरत आहेत. पालिकेने तत्काळ या डेपोकडे लक्ष देऊन डेपोतील या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी इथल्या कर्मचा-यांनी केली आहे.

 

पुढील बातमी
इतर बातम्या