फळ्यावरचा बाप्पा !

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

आतापर्यंत अनेक इको फ्रेंडली मुर्ती पाहल्या असतील. पण लोअर परळच्या रुस्तम गणेशोत्सव मंडळानं मात्र वेगळाच पायंडा घातलाय. मंडळानं बाप्पाची मूर्ती स्थापन केली नाहिये. तर एका फळ्यावर बाप्पाचे चित्र काढले आहे. अनंत चतूर्थीला बाप्पाचे चित्र नारळाच्या पाण्यानं पुसले जाणार आहे. उत्सवात गणपतीजवळ वेगवेगळा सुकामेवा प्रसाद म्हणून ठेवण्यात आला आहे. गेल्या 37 या मंडळानं ही परंपरा जपली आहे. अशा प्रकारे सर्वांनी गणेशोत्सव साजरा केला तर प्रदूषण होणार नाही असं या मंडळातील सदस्यांचे मत आहे. जनजागृतीच्या दृष्टीनं देखावाही साकारण्या आला आहे. त्यासाठी या मंडळाला आतापर्यंत अनेक बक्षीसंही मिळाली आहेत.

 

पुढील बातमी
इतर बातम्या