किल्ले स्वच्छतेचा घेऊ वसा

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

शिवडी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शिवडी किल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी समितीच्या वतीने किल्यातील कानाकोपऱ्यात साठलेला कचरा साफ करण्यात आला. त्याचबरोबर ठिकठिकाणी साठलेले डेब्रीच देखील उचलण्यात आले. 'किल्ले स्वच्छतेचा घेऊ वसा, जगाच्या पटलावर उमटवू महाराष्ट्राचा ठसा' हा संदेश याद्वारे देण्यात आला. पुरातत्व, वस्तुसंग्रहालये आणि गड संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबवली जातेय. या वास्तूचे योग्य प्रकारे जतन करून लोकपयोगासाठी त्याचा वापर करता येईल, असं गड संवर्धन समितीचे संचालक सुशील गरजे यांनी सांगितले. तसंच शिवडी किल्ल्यासोबतच बॅण्डस्टॅण्ड इथल्या वांद्रे किल्याचीही साफसाई केली आहे. हे स्वच्छता अभियान राज्यातील 100 किल्ल्यांवर होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या