तेलगु समाजाचा बाप्पा

दादर - दादरच्या तेलगु समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला यंदा 64 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मंडळाच्या वतीने 11 दिवसांचा गणपती बसवण्यात येतो. मंडळात 90 टक्के लोक तेलगू आहेत आणि 10 टक्के महाराष्ट्रीयन लोक आहेत. गेल्या 4 वर्षांपासून पुनर्वसन सुरु असल्यामुळे हे मंडळ 4 फुटांची मूर्ती बसवते. भजन आणि भक्तीसंगीताचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. त्याचबरोबर शालेय मुलांसाठी स्पर्धा आणि वेगवेगळे खेळ घेतले जातात. पुनर्वसनानंतर स्थानिक रहिवाशी नवीन इमारतीत राहण्यासाठी आल्यानंतर  मोठी गणेश मुर्ती बसवण्यात येईल असे मंडळाचे अध्यक्ष सुर्या तेड्डू यांनी सांगितले. 

पुढील बातमी
इतर बातम्या