‘वरळीच्या राजा’ मंडळाची श्रद्धांजली

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वरळी - वरळीतल्या महत्वाच्या दोन गणपतींपैकी एक म्हणजे वरळीचा राजा. प्रेमनगर या विभागात असलेल्या या गणपतीची स्थापना 1962 साली करण्यात आली आहे. यंदा मंडळाचे 54 वे वर्ष आहे. या ठिकाणी स्थापन केली जाणारी श्रीं ची मूर्ती 11 फूटांची भव्य मूर्ती चिंचपोकळीचे मूर्तीकार प्रणय वस्ते यांनी घडवली आहे. गेल्यावर्षी मंडळाने इको फ्रेंडली देखावा साकारला होता. यंदा मंडळाने महाड दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावले आहेत. तसेच शहीद पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांनाही श्रद्धांजली वाहिली आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी हातभार लावला जातो. विद्यार्थ्यांना लागणारी शालेय पुस्तके दिली जातात, अशी माहिती मंडळाचे खजिनदार विनायक भोले यांनी दिली. 

पुढील बातमी
इतर बातम्या