पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच महापालिकेचे कान उपटले होते. तरीही राज्याच्या पर्यटन आणि सांस्मकृतिक विभागाला अजूनही जाग आलेली दिसत नाही. अक्सा आणि मढ येथे मोठया प्रमाणात पर्यटक येत असतात. येथे सुरक्षेच्या दृष्टीने  कोणत्याही सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. सर्व सेवा उपलब्ध करून देण्याबाबत महापालिकेने आश्वासन दिले होते. मात्र तेथे एकही धोक्याची सूचना देणारे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस ठाणे, यांपैकी कोणतीच सेवा उपलब्ध नाही. येथे अपघात घडल्यास स्वत:च्या खिशातून पैसा खर्च करावा लागत असल्याची माहिती जीवनरक्षक नथुराम सूर्यवंशी यांनी दिली. त्यामुळे महापालिका आणि पर्यटन विभाग उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.  

 

पुढील बातमी
इतर बातम्या