श्रींचा राजा विराजमान होतोय शीश महलात

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

करुणामय दृष्टी, सदैव आशीर्वाद देणारा हात, शीशमहालात एखाद्या राजासारखा ऐटीत बसलेला बाप्पा, त्याचं हे मनमोहक रूप पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. लोअर परळमध्ये श्रींचा राजा म्हणून हा बाप्पा प्रसिद्ध आहे. श्री लोकरे यांनी बाप्पाची ही मूर्ती 2009 मध्ये स्थापन केली. श्री लोकरे या मूर्तीचं विसर्जन करत नाहीत. वर्षभर ही मूर्ती बंद काचेत ठेवली जाते. गणेशोत्सवादरम्यान या मूर्तीची 10 दिवस स्थापना केली जाते. श्री लोकरे यांची लालबागच्या राजावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या आदल्या वर्षीच्या डेकोरेशनची प्रतिकृती लोकरे तयार करतात. यावर्षी लोकरे यांचा राजा शीशमहलात विराजमान होणार आहे. शीश महाल बनवण्यासाठी लोकरे यांना 1 महिना लागला. 

पुढील बातमी
इतर बातम्या