जमीन खचून 15 मुले जखमी

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

डॉकयार्ड रोड - येथील पहाडवाली मशीदच्या जवळ असलेल्या रेल्वे गोडाऊनजवळ कंपाउंडची जमीन खचल्याने 15 मुले जखमी झाली. जखमी मुलांपैकी दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे.

ही मुले संध्याकाळी 5.30 च्या सुमारास खेळत असताना अचानक जमीन खचली. त्यामुळे ही मुले 12 फूट खोल खाली पडली. स्थानिक नागरिकांनी धावपळ करून या मुलांना रुग्णालयात दाखल केले. 12 मुलांवर जेजे तर 3 मुलांवर प्रिन्स अली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, एमआयएम आमदार वारिस पठाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.   

पुढील बातमी
इतर बातम्या