साफसफाईसाठी 28 कोटींचा कचरा ?

  • पूजा भोवड & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

मुंबई - मुंबईतले रस्ते चकाचक दिसावेत म्हणून सफाईसाठी महापालिकेनं काही दिवसांपूर्वी व्हॅक्युम क्लिनर खरेदी केले होते. काही दिवस या यंत्रांनी चांगलं कामही केलं. पण फक्त काहीच दिवस. ही यंत्र बिघडल्यानंतर पालिकेच्या सांताक्रूझमधल्या वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली. पण ती यंत्र अजूनही तिथेच धूळखात पडून आहेत. आणि अशातच पालिकेनं पुन्हा एकदा अशीच यंत्र खरेदी करण्यासाठी तब्बल 28 कोटी खर्च करण्याचा घाट घातलाय. आधीचीच यंत्र बिघडलेल्या अवस्थेत धूळखात पडून असताना पुन्हा नवी खरेदी कशासाठी असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय. शिवाय ही यंत्र विदेशी बनावटीची असल्यामुळे त्यांची दुरुस्ती ही वेळखाऊ प्रक्रिया होऊन बसते. त्यामुळे हा सगळा प्रकार कुठल्या कंत्राटदाराच्या हातसफाईसाठी तर नाही ना अशीही शंका घेतली जाऊ लागलीये. 

पुढील बातमी
इतर बातम्या