सामाजिक कार्यात चिमुकलीचा हातभार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • कला

मनात समाजप्रबोधनाचा ध्यास असलेल्या अवघ्या 13 वर्षाच्या क्षिरजा राजे हीने पेपर क्विलिंगच्या माध्यमातून बाहुल्या तयार केल्या आहेत. तिने तयार केलेल्या या बाहुल्यांचे प्रदर्शन बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे कलादालन आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनातून येणारा सर्व निधी गरीब क्षयग्रस्त रुणांसाठी वापरण्यात येणार आहे. क्षिरजा राजे  दहिसरच्या रुस्तमजी शाळेत नववीत शिकत आहे. गेल्या 3 वर्षांपासून पेपर क्विलिंगच्या माध्यमातून तिने 200 हुन अधिक बाहुल्या तयार केल्या आहेत. या बाहुल्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

वयाच्या अवघ्या नऊ वर्षापासून क्षिरजा या बाहुल्या तयार करायला शिकली आणि तिने या 200 हून अधिक बाहुल्या बनवल्या. 

आपल्याप्रमाणे प्रत्येकाने अशा प्रकारे कोणती न कोणती कला जोपासली पाहिजे.

- क्षिरजा राजे

हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेला प्रत्येक जण क्षिरजाच्या कलेचे कौतुक करत आहे. नऊ वर्षांची असताना क्षिरजा आपल्या आईसोबत पेपर विकल्पाच्या कार्यशाळेत गेली होती. तिथे गेल्यानंतर ती खूप लहान असल्याने तिला हे करता येणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. मात्र जिद्द कायम ठेवत ती या बाहुल्या तयार करण्यास शिकली.

पुढील बातमी
इतर बातम्या