दिंडोशीत उलगडलं बालचित्रविश्व!

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

दिंडोशी - विद्यार्थ्यांच्या चित्रकलेला वाव देण्यासाठी आणि उद्याचे भावी चित्रकार निर्माण होण्यासाठी गेली ८ वर्षे दिंडोशी येथील आर्ट स्टेशन ही संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. रविवारी दिंडोशीच्या आर्य भास्कर उद्यानात या बालचित्रकारांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत गोकुळधाम आणि अप्पर गोविंदनगर येथील संस्थेच्या चित्रकला कार्यशाळेतील सुमारे 110 बाल चित्रकारांनी सहभाग घेतला.

चित्रकलेच्या माध्यमातून या चित्रकारांनी साकारलेल्या चित्रांचं आमदार सुनील प्रभू यांनी कौतुक केलं. या चित्रांमधून या बाल चित्रकारांच्या विविध पैलूंचा उलगडा तर होतोच, पण त्यासोबतच त्यांच्या चित्रकला विकासाला देखील नवी चालना मिळते असं प्रभू यावेळी म्हणाले.

दिंडोशीचे आमदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती नमिता जैन, दुसऱ्या क्रमांकाचा विजेता अर्णव अगरवाल आणि तृतीय क्रमांकाची विजेती श्रीप्रिया मेडीराजू यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या वेळी महिला विभाग संघटक साधना माने, शाखाप्रमुख संदीप जाधव, आर्ट स्टेशनचे संतोष लांजेकर, मनोहर चोरगे, डॉ. गायत्री करंबळे, साहिल लांजेकर, शैलेश लांजेकर, सोनाली तोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या