'मुंबई पोर्ट ट्रस्ट'ची चित्रकला स्पर्धा

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

वडाळा - दरवर्षीप्रमाणे यंदाही 'मुंबई पोर्ट ट्रस्ट'च्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वडाळा पूर्व येथील 'तेजसनगर रेनॉल्ड्स इन्स्टिट्युट'च्या सभागृहात रविवारी 'मुंबई पोर्ट ट्रस्ट' कामगारांच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता 1 ली ते 9 वी च्या 50 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. चित्रांचा विषय विद्यार्थ्यांना ठरवून न देता विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडेल अशा विषयावर चित्रे काढावीत असे सांगण्यात आले होते. त्यामुळे चित्राच्या विषयांचे दडपण विद्यार्थ्यांवर नसल्याने मनमोकळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात विदयार्थ्यांनी चित्र रेखाटली असून, या स्पर्धेत उत्तम चित्र काढलेल्या विजयी स्पर्धकास 26 जानेवारी रोजी पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती इन्स्टिट्युटचे व्यवस्थापक राजू राठोड आणि सचिन जाधव यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या