वन्य प्राण्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • कला

प्रसिद्ध छायाचित्रकार डॉ. अवनिश राजन यांच्या जगभर प्रवासातील महत्वपूर्ण वन्य प्राणी जीवनाची अप्रतिम छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. फोर्टमधल्या डॉ. डी. एन. रोड येथील दी फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया येथे हे प्रदर्शन 22 जूनपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या रसिक प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे. या प्रस्तुत प्रदर्शनात डॉ. राजन यांनी वन्य प्राण्यांचे जनजीवन आपल्या कॅमेर्‍यात टिपले असून त्यांच्या भावविश्वाची अनुभूती दर्शवणारा अनोखा कलाविष्कार या प्रदर्शनातून मांडण्यात आला आहे.

डॉ. राजन यांना बालपणापासून विविध छायाचित्रे काढण्याचा छंद आहे. आजही ते आपला डॉक्टरी व्यवसाय सांभाळून वेळ मिळेल तेव्हा आपला छंद जोपासतात. त्यांनी आपल्या वन्य छायाचित्रणांचे प्रदर्शन जगातील आणि भारतातील अनेक कलादालनातून भरवले असून त्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. डॉ अवनिश राजन यांना आजपर्यंत 100 हून जास्त सुवर्णपदके आणि 300 पारितोषिके मिळाली आहेत. ही पारितोषिके त्यांना चीन, ऑस्ट्रेलिया, तुर्की, श्रीलंका वगैरे सुमारे 32 देशातील मान्यवर संस्थांकडून मिळाली आहेत. अनेक प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा डॉ. अवनिश राजन यांनी वन्य जीवांची छायाचित्रे काढली आहेत. हा रम्य आणि मनोवेधक छायाचित्रांचा आविष्कार सर्वांना आवडेल असाच आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या