मोनोरेलचे खांब होणार बॅनरमुक्त

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

परळ - विविध सामाजिक कार्य करत असलेली वरदा आर्ट ही संस्था महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागासोबत गेल्या एक वर्षापासून स्वच्छ भारत अभियान या उपक्रमासाठी कार्यरत आहे. कलेच्या माध्यमातून या संस्थेला एफ दक्षिण आणि एफ उत्तर भागात येणाऱ्या सर्व मोनोरेलच्या खांबांवर रंगरंगोटी करण्याचं काम एमएमआरडीएकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोनोरेल मार्गिकेचे चित्र बदलणार असून हे खांब लवकरच बॅनरमुक्त होणार आहे.

चेंबूर ते वडाळा या पहिल्या मार्गिकेदरम्यानचे काही खांब जड वाहनांच्या मार्गादरम्यान आहेत. तर काही पूर्वमुक्त मार्गाला समांतर आहेत. मात्र दुसर्‍या टप्प्यातील मोनोरेलचे खांब हे अत्यंत वर्दळीच्या आणि निवासी भागात असल्याने सध्या तिथे अनधिकृत पार्किंगचा विळखा बसला आहे. अँटॉप हिल परिसर, वडाळा, नायगाव, परळ, भारतमाता, ना. म. जोशी मार्ग येथे अनधिकृत पार्किंग तसेच मोनोरेल खांबावर अनधिकृत पोस्टर्स, बॅनरबाजी दिसून येत आहे. मात्र यावर कायमचा तोडगा काढता यावा यासाठी एममएआरडीएने यापूर्वी डीजिटल बॅनरचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र तो पुढे बारगळला. यामुळे आता लोकार्पणापूर्वी मोनोरेल चकाचक दिसण्यासाठी एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागातील मोनोरेलचे खांब रंगवण्याची जबाबदारी वरदा आर्ट या संस्थेला देण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या