तैलचित्राचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

माझगाव - हिंद महासागरातील अनेक देशात आपले साम्राज्य स्थापन करणारे दर्यावर्दी सम्राट राजेंद्र चोला प्रथम यांच्या चित्राचे अनावरण राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम माझगाव येथील गोदी येथे संपन्न झाले. राजेंद्र चोला यांच्या राज्यारोहाणाला एक हजार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माजी खासदार तरुण विजय यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला माझगाव गोदीचे व्यवस्थापकीय संचालक रियर अडमिरल (निवृत्त) आर.के शरावत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, आ. तमिळ सेल्वन आणि इतर मान्यवर , गोदीचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

पुढील बातमी
इतर बातम्या