परळमध्ये कोकण महोत्सवाचे आयोजन

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • कला

परळ - सदाकांत धवण उद्यानात कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शिवसेना शाखा क्रमांक 200 च्या वतीने अदिती सावंत यांनी महोत्सवाचे आयोजन केलंय. कोकणातील विक्रेत्यांना एक उत्तम बाजरपेठ मिळावी या हेतूने महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवात मालवणी मसाला, कुळीथ पीठ, डांगर, पापड, लोणची विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मटण-वडे, कोळंबी, खेकड्याचा रस्सा याची चवही तुम्हाला चाखता येईल. तसंच विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही ठेवण्यात आले आहेत. 11 जानेवारीपर्यंत मुंबईकर या महोत्सवाचा आनंद घेऊ शकतात.

पुढील बातमी
इतर बातम्या