स्टोरी ऑफ मेकर्सचे अनोखं प्रदर्शन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • कला

सायन - तरुण मित्र मंडळ प्रस्तुत स्टोरी ऑफ मेकर्स यांच्या माध्यमातून अनोखे इनोव्हेटीव्ह गॅजेटचे प्रदर्शन 25 ते 26 मार्चला किंग्ज सर्कल येथील श्री हिरजी भोजराज अॅन्ड सन्स के.वि.ओ जैन येथे आयोजित करण्यात आले आहे.

 3 डी प्रिंटिंग, हार्डवेयर डेव्हलपमेंट,कल्चर ऑफ इनोव्हेशन,होम ऑटोमेशन यांसाखे अनेक गॅजेट्स या प्रदर्शनात आहेत. एकूण 17 राज्यातील अभियांत्रिकी आणि शाळकरी विद्यार्थांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. 170 प्रोजेक्ट्स पैकी टाटा सेंटर ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड डिजाईन आयआयटी बॉम्बेतर्फे निवडक 70 इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट्स या प्रदर्शनात सादर करण्यात आले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या