कादर खान यांची प्रकृती नाजूक; कॅनडात उपचार सुरू

प्रसिद्ध अभिनेते कादर खान (८१) यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर कॅनडामधील एका रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. कादर खान यांना प्रोग्रेसिव सुपरान्यूक्लियर पाल्सी हा अाजार झाला असून त्यांना बाय पंप व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती त्यांचा मुलगा सर्फराज याने दिली अाहे.  हा एक मेंदूचा अाजार असून यामध्ये शरीराचे काही भाग काम करत नाहीत. 

श्वास घेण्यास त्रास

त्यांचा मुलगा सर्फराज अाणि सून शाहिस्ता रुग्णालयात त्यांची काळजी घेत अाहेत. प्रोग्रेसिव सुपरान्यूक्लियर पाल्सीमुळे कादर खान यांना श्वास घेण्यास त्रास होत अाहे. सामान्य व्हेंटिलेटर त्यांच्यासाठी उपयोगी नसल्याने त्यांना बाय पंप व्हेंटिलेटरवर ठेवण्यात अालं अाहे. खूप कमी वेळा ते शुद्धीवर असतात अाणि खूप कमी ते बोलतात. 

३०० चित्रपटात काम

कादर खान यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं अाहे. त्यांनी चित्रपटांसाठी डायलाॅगही लिहिले अाहेत. ‘दिमाग का दही’ हा २०१५ मध्ये अालेला त्यांचा शेवटच्या चित्रपट अाहे. ९० च्या दशकात गोविंदा अाणि कादर खान यांची जोडी सुपरहीट होती. या दोघांनी दूल्हे राजा,  कुली नं. 1, राजा बाबू अाणि आंखे अादी चित्रपटात काम केलं अाहे.  


पुढील बातमी
इतर बातम्या