ठरलं...नोव्हेंबरमध्ये रणवीर-दीपिकाचं लग्न!

  • मुंबई लाइव्ह टीम & शिव कटैहा
  • बॉलिवूड

अनुष्का शर्मा, नेहा धुपिया आणि सोनम कपूर यांच्यानंतर अजून एक बॉलिवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. आणि ही मुलगी दुसरीकडे कुठे नसून बॉलिवूडमध्येच 'दिली' गेली आहे. त्यामुळे तिचं माहेर आणि सासरही बॉलिवुडच असणार आहे!

रणवीर म्हणतो, दीपिका 'डॅम हॉट'!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे ती रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या आधी अफेअरची आणि नंतर लग्नाची! त्या दोघांना अनेकदा सोबत पाहिलं गेलं आहे. कान्स फेस्टिव्हलमध्येही जेव्हा दीपिका देली, तेव्हा तिथून तिने काही फोटो शेअर केले होते. हे सर्व फोटो रणवीरने लाइक केले होते. शिवाय 'डॅम हॉट' अशी कमेंटही केली होती. माध्यमांसमोर जरी या दोघांनी कधी आपल्या नात्याची वाच्यता केली नसली, तरी त्याबद्दल चर्चा तर होतच होत्या. आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय.

नोव्हेंबरमध्ये होणार लग्न

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण येत्या नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार आहेत. १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान लग्नाची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे. हे लग्न मुंबईतच होण्याची शक्यता आहे. वास्तविक रणवीर-दीपिकाला डेस्टिनेशन वेडिंगच करायची इच्छा आहे. मात्र, दोघांच्या पालकांची इच्छा मुंबईत लग्नाची आहे. जेणेकरून त्यांचे नातेवाईकही लग्नाला उपस्थित राहू शकतील.

लग्नाची बोलणीही झाली!

दीपिकाच्या आई-वडिलांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत येऊन रणवीरच्या आई-वडिलांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. दीपिकाच्या घरी या दोन्ही कुटुंबियांची भेट झाली. यावेळी लग्नाच्या तारखेवर चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे.

'पद्मावत'ला मोठं यश

रणवीर आणि दीपिका यांनी शेवटचं संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' या सिनेमात एकत्र काम केलं आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगलं यश मिळवलं. रणवीरने निभावलेल्या खिलजीच्या भूमिकेलाही सर्वांनी पसंती दिली. सध्या रणवीर सिंह आलिया भट्टसोबत 'गली बॉय' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे, तर दीपिका पदुकोण जयंत परांजी यांच्या 'लव 4 एव्हर' या चित्रपटाचं काम करत आहे.


हेही वाचा

रणबीर म्हणतो 'आलिया माझी क्रश'

पुढील बातमी
इतर बातम्या