बिग बी अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा अभिषेक बच्च यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फिल्मफेअर आणि काही सेलिब्रिटिंना याबद्दल ट्विट केलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी शनिवारी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर अभिषेक बच्चननं देखील ट्विटरवर कोरोना झाल्याची माहिती दिली. अभिषेकनं लिहिलं की, "आज मी आणि बाबा दोघंही COVID 19 पॉझिटिव्ह आलो आहोत. आमच्यात COVID 19 ची सौम्य लक्षणं आढळली आहेत. आम्ही याबद्दल अधिकाऱ्यांना कळवलं आहे. आमच्या कुटुंब आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व चाचण्या घेत आहोत.मी सर्वांना विनंती करतो की शांत राहा घाबरू नका. धन्यवाद."
अभिषेक बच्चन तीन दिवसांपूर्वी एका डबिंगसाठी अंधेरी गेले होते, अशी चर्चा आहे. शनिवारी अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली. त्यांना मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.