रविवारी १२ जुलैला अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांची कोरोनोव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली.
"ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या अभिषेक बच्चन यांचीही COVID 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जया बच्चन यांची चाचणी नेगेटिव्ह आली आहे. सीआयडीआयडी १ for साठी सकारात्मक चाचणी केली आहे. बच्चन कुटुंब लवकरात लवकर बरे व्हावे अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो.
शनिवारी ११ जुलै रोजी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोनव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याशिवाय त्यांचा जुहूमधील बंगला पालिकेतर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आला.
याशिवाय अभिनेता अनुपम खेरच्या कुटुंबातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनुपम खेर यांच्या आईला, भावाला कोरूना झाल्याचं समोर आलं. अनुपम खेर यांची चाचणी मात्र नेगेटिव्ह आली. अनुपम खेर यांनी याबद्दल स्वतः ट्विटरवर माहिती दिली.
वांद्रे येथील अभिनेत्री रेखाचा बंगला 'सी स्प्रिंग्स'सुद्धा शनिवारी रात्री सील करण्यात आला. रेखा यांच्या बंगल्याचा सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यानंतर पालिकेनं बंगला सील करत कंन्टेंमेंट झोनचा शिक्का मारला.