इश्श! हा बॉलिवूड अभिनेता झाला गरोदर

अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी घेऊन आलाय. नाही, नाही! ही आनंदाची बातमी त्याच्या कोणत्या नव्या सिनेमाबाबत नाही. ही बातमी आनंदाची असली तरी सर्वांसाठी ती तितकीच धक्कादायक आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्यासोबत जे घडले आहे त्यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही.

अक्षय कुमार चक्क गरोदर होता आणि त्याने जुळ्या, तिळ्या नव्हे तर तब्बल सहा मुलांना जन्म दिला आहे. बाळ जन्माला आले की रडते, पण ही मुले रडण्याऐवजी हसत हसतच जन्माला आली. त्यामुळे ही मुले सामान्य नाहीत. तुम्हालाही अक्षयच्या मुलांना पाहायची उत्सुकता असेल. मग अक्षयच्या गरोदरपणाचा प्रवास या व्हीडिओतून पाहा.

आता तरी कळाले ना की नक्की प्रकरण आहे तरी काय? अक्षयने यापूर्वी 'खतरो के खिलाडी' आणि 'मास्टर शेफ ऑफ इंडिया' या रिअॅलिटी शोंचे सूत्रसंचालन केले आहे. आता अक्षयकुमार एका नवीन भूमिकेत म्हणजेच परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ५ कॉमेडी' शोद्वारे तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या शोच्या टिझरमध्ये अक्षयने गरोदर असल्याची भूमिका केली आहे.

काही दिवसांपूर्वी कॉमेडियन झाकिर खानला ट्वीट केले होते. "काहीतरी आंबट खाण्याची इच्छा होत आहे. काही सल्ला देऊ शकतोस का? मी आधीच खूप काढले आहे," असे ट्वीटमध्ये अक्षयने नमूद केले होते.

यानंतर अक्षयने आणखी एक ट्वीट केले होते. हे ट्वीट वाचून तर अक्षयचे चाहते संभ्रमात पडले होते. "आता तर पोटात लाथा मारण्यासही सुरुवात झाली आहे. राहावत नाही आहे. असे का होत आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल," असे ट्वीट त्याने केले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या