अनीता हसनंदानीनं दिला मुलाला जन्म, नवऱ्यानं पोस्ट करत दिली गोड न्यूज

टीव्ही अभिनेत्री अनीता हसनंदानी आई बनली आहे. तिनं गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याची माहिती 'नागिन' सीरियल फेम अनीताचा पती रोहित रेड्डीनं स्वतः रात्री उशीरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली.

त्यानं पोस्ट शेअर करत लिहिलं की, 'ओह बॉय' अनीता-रोहित लग्नाच्या ८ वर्षांनंतर पहिल्यांदा पॅरेंट्स बनलो आहोत. या दोघांचे लग्न १४ ऑक्टोबर २०१३ मध्ये झाले होते. याच्या पूर्वी तीन वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते.

रोहितनं जे फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये तो पत्नी अनीताच्या गालावर किस करताना दिसतोय. तर अनीता बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. फोटोच्या खाली डेट लिहिली आहे, ९ फेब्रुवारी २०२१. यासोबतच 'इट्स ए बॉय' असंही लिहिलं आहे. रोहितची ही पोस्ट समोर आल्यानंतर सेलेब्ससह चाहते या दोघांना शुभेच्छा देत आहे.

अनीता आणि रोहित यांनी १४ ऑक्टोबर २०२० ला एक व्हिडिओ शेअर करत पॅरेंट्स बनत असल्याची अनाउंसमेंट केली होती. व्हिडिओमध्ये कपलनं पहिली भेट, साखरपूडा, लग्नाला रीक्रिएट करत नंतर प्रेग्नेंसीविषयी सांगितलं होतं.


पुढील बातमी
इतर बातम्या