अभिनेता इरफान खान सध्या ट्युमरने ग्रस्त आहे. काही दिवसांपूर्वीच इरफानने आपल्या आजाराबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्याच्या आजाराची बातमी कळल्यानंतर अस्वस्थ झालेले त्याचे चाहते तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
सध्या तो पुढील उपचारासाठी लंडनला गेला आहे. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोबरोबरच त्याने आपल्या सावलीचा फोटो पोस्ट करत त्याला रेनर मारिया रिल्का यांची इमोशनल कविता कॅप्शन म्हणून लिहिली आहे.
अगदी पहिल्या दिवसापासून इरफान सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात आहे. त्याच्या आजारपणाबाबत खुद्द त्यानेच ही माहिती दिली होती. इरफान सध्या लंडनमध्ये प्रसिद्ध डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहे.